हिंगोली
हिंगोली विभागातील सर्व ताज्या घडामोडी
शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा! मोफत गाळ आणि वाळू मिळणार; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नदीपात्रातील गाळ काढून पूर नियंत्रणाला चालना देण्यासोबतच त्यातून उपलब्ध होणाऱ्या गाळ, माती, वाळू, दगड आणि गोट्यांचा नियोजित वापर करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे नदीपात्रातील गाळाचा योग्य वापर होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आणि घरकुल लाभार्थ्यांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. नदीपात्रातून काढण्यात येणारा सुपीक गाळ आणि माती संबंधित भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने मोफत दिली जाणार आहे. गाळाची वाहतूक शेतकऱ्यांना स्वतः करावी लागणार असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शून्य रॉयल्टी पास देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतीच्या सुपीकतेसाठी गाळाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. नदीपात्राच्या खोलीकरणातून निघणारे दगड आणि गोटे शेत-पाणंद रस्ते, शासकीय...
सविस्तर वाचा
सणासुदीआधी महागाईचा आणखी एक झटका! १५ दिवसांत गूळ किलोमागे ७-८ रुपयांनी महागला; दिवाळीपर्यंत दर वाढण्याची शक्यता
धरणे तुडुंब, तरी तहान कायम! राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अजूनही ७५८ टँकरवर पाणीपुरवठ्याची वेळ
टोमॅटो दरवाढीचा फटका कायम; पुरवठा घटल्याने बाजारात 30% वाढ, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने दिलासा मिळण्याची शक्यता
मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम; मान्सूनची वाटचाल मंदावल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली